वैयर्थतेने भरलेल्या, असहिष्णुतेने चिरफाळत चाललेल्या, भयाण हिंसेच्या, क्रौर्याच्या टकमक टोकावर उभ्या असलेल्या सद्यकालीन सभोवाराचा उभा-आडवा छेद आणि वेध घेणारं हे जळजळीत शोभनाट्य आहे
‘प्रतिक्षिप्त’ हे शीर्षक या स्तंभलेखनपर पुस्तकाला देताना पवारांना नेमकं काय अभिप्रेत आहे कल्पना नाही, परंतु मज्जारजू आणि मेंदूतही संदेशवहन पोहचवून भयंकराच्या दरवाजासमोर धडका मारायला लावणारं, कृतिशील हस्तक्षेपाकडे निर्देश करणारं, हे मौलिक पुस्तक आहे, असं आवर्जून अधोरेखित करावंसं वाटतं. ‘प्रतिक्षिप्त’ म्हणजे भाषेच्या चौफेर हुकमी फटकाऱ्यांचं तीव्र ज्वालाग्राही रसायन.......